News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथील विद्यार्थिनीने भालाफेक स्पर्धेत विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड झाली

जनता विद्यालय अभोणा येथील विद्यार्थिनीने भालाफेक स्पर्धेत विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड झाली
  डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथील इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी कु. लक्ष्मी हरिश्चन्द्र चव्हाण या विद्यार्थिनीने नाशिक येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत भालाफेक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकवाला असून सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस व श्री बागुल वाय सी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनीचे संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती मा. ताईसाहेब, सचिव ऍड. मा. मृणालताई जोशी, मुख्याध्यापक श्री बोवा एस एस. उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.