जनता विद्यालय अभोणा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अभोणा, ता. १०- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आभोना येथे गुरुंविषयी आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्येची देवता सरस्वती, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर, माजी सचिव डॉ विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सागर ए. एम. होते. तर उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी पर्यवेक्षक श्री देशमुख के के, श्री किरण सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. यात सर्वप्रथम सर्व मान्यवर व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर तनुष्का बोरसे, अनुष्का अहिरराव, अश्विनी जगताप, लक्ष्मी चौधरी, हर्षदा वाघ, भूमी राजभोज, सिद्धी महाले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री चंद्रकांत येवला, श्री ज्ञानेश्वर सोनेवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री सागर ए एम यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हर्षाली चव्हाण व विद्या नागरे या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
