News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व आनंद मेळावा उत्साहात साजरा

जनता विद्यालय अभोणा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व आनंद मेळावा उत्साहात साजरा
अभोणा, ता. 9- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा व आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अभोणा यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांना व्यवहार ज्ञान कळावे या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलन त्याचबरोबर आनंद मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलाताई बिडकर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव मा. ऍड. श्रीमती मृणालताई जोशी, संचालक श्री प्रभाकरजी पवार, श्री श्रीकृष्ण चंद्रात्रे, अभोणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री शेखर जोशी, श्री राजेंद्र हिरे, श्री संजय पाटील, श्री. विजय चव्हाण, ऍड मनोज सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक बोरसे साहेब उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष भाषणात मा. ताईसाहेबांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आई-वडिलांचा आदर करा, त्यांचा रोज सकाळी नमस्कार करा तसेच वाचन करा असा संकल्प करण्याच्या सूचना दिल्या व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. 
     त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे एकूण 30 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. त्या प्रत्येक स्टॉलला सर्व प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर विद्यार्थी, पालक यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी तयार केलेले वेगवेगळ्या सर्व खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांचे विक्री झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारात ज्ञान, व्यवसाय ज्ञान प्राप्त होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे मा. ताईसाहेब, मा. मृणालताई जोशी व सर्व पाहुण्यांनी खूप कौतुक केले.
     या कार्यक्रमात एकूण 37 कार्यक्रम सादर करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे व श्रीमती प्रियंका खैरनार यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले. 
    या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, श्रीमती गायकवाड बी. एस. श्री आहिरे व्ही ए. श्रीमती जाधव पी के. श्री महाले एस वाय, श्री बागुल आर एम. श्री. जाधव ए. वाय. श्री बागुल वाय. सी., श्री शेलार के एस, आयडियल इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य श्री शेवाळे एस एस व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,  वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी, इंग्लिश मिडीयमचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृहातील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली.