News Cover Image

गाईड कॅप्टन प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या पूर्ण

गाईड कॅप्टन प्राथमिक व प्रगय प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या पूर्ण 
अभोणा- शिक्षण विभाग जि. प. नाशिक व नाशिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 डिसेंबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत नाशिक भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण केंद्र मुबंई नाका, नाशिक येथे गाईड कॅप्टन प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथील उपशिक्षिका श्रीमती किर्ती बाळकृष्ण गावित यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांना कार्यालयच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. हे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.