जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे जागतिक आदिवासी दिन, क्रांतिदिन व रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.
अभोणा- ता.९- आज डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन व रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सागर ए एम सर होते. यावेळी सर्व प्रथम भगवान बिर्सामुंडा, कर्मवीर दादासाहेब बिडकर, तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनींनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर श्री खुरकुटे जी एन, श्री बागुल आर.एम. श्री चौधरी ए जी या शिक्षकांनी आपल्या मनोगतातून जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन व रक्षाबंधन निमित्ताने विद्यार्थ्यांना माहिती दिली. शेवटी श्री सागर ए एम सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व शुभेच्छा दिल्या.
नंतर विद्यालयात रक्षाबंधन साजरे करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राखी बांधली तसेच महिला शिक्षकांनीही शिक्षकांना राख्या बांधल्या. अशा पद्धतीनी रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी पर्यवेक्षक श्री अहिरे आर एस, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री किरण सूर्यवंशी, वसतिगृह अधीक्षक श्री सावकार सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
