डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे " महापरिनिर्वाण दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मा .श्री. बोवा सर होते. त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य सामाजिक आपल्या" मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती . प्रियंका खैरनार यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मा .श्री. बोवा सर यांनी बाबासाहेबांचा जीवनपट व देशासाठी असणारे त्यांचे योगदान विद्यार्थ्यांना सांगितले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विशेष "वाचन उपक्रम" घेण्यात आला. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मूल्य
रुजवण्यासाठी विविध गाणी, नृत्य व खेळांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक ,उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परेश देसाई यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
