News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे स्काउट & गाईड कॅम्प संपन्न

जनता विद्यालय अभोणा येथे स्काउट & गाईड कॅम्प संपन्न
अभोणा, ता.- 03- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांचा स्काउट & गाईड कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प चनकापूर येथे गेला होता. यावेळी सर्वप्रथम स्काउट झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना घेण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी स्वयंपाक केला. नंतर तयार केलेल्या पाककृती सादर केल्या. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री बोवा एस. एस, पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. श्री आहिरे व्ही. ए. श्री बागुल वाय सी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.