जनता विद्यालय अभोणा येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
अभोणा- ता. १- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री सागर ए. एम. यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपमुख्याध्यापक श्री. धात्रक एस. सी. यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक व लोकशीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. शेवटी श्री सागर ए एम सरांचे अध्यक्षीय भाषण झाले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री अहिरे आर एस उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत येवला यांनी केले.
